E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अर्थ
शेअर बाजारात हाहाकार; १,३९० अंकांची पडझड
Wrutuja pandharpure
02 Apr 2025
मुंबई
: अमेरिकेतील ट्रम्प प्रशासन आज (बुधवार) पासून भारतासह अनेक देशांवर वाढीव आयात शुल्क लागू करत आहे. त्याचे पडसाद मंगळवारी शेअर बाजारात उमटले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १,३९० अंकांनी कोसळला. आयटी आणि खासगी बँकांचे समभाग विशेषतः घसरले. दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३५३.६५ अंकांनी घसरला.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाने जगभरातील गुंतवणूकदारांमध्ये मोठी चिंता आणि भीती आहे. त्याचे पडसाद काल बाजारात उमटले. नवीन आर्थिक वर्षाची सुरूवात काल मुंबई शेअर बाजारात विक्रीच्या मार्याने झाली. यात गुंतवणूकदारांचे ३.४९ लाख कोटींचे नुकसान झाले.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक काल १.८० टक्के म्हणजे १,३९०.४१ ने घसरून ७६,०२४.५१ वर स्थिरावला. मुख्य ३० पैकी २८ कंपन्यांचे समभाग कोसळले. सत्रांतर्गत निर्देशांक १.९४ टक्के म्हणजे १,५०२.७४ अंकांनी घसरुन ७५,९१२.१८ पर्यंत खाली आला होता. अखेरच्या सत्रात तो काहीसा सावरला. दुसरीकडे, निफ्टी १.८० टक्के म्हणजे ३५३.६५ अंकांनी घसरुन २३,१६५.७० वर स्थिरावला.अमेरिकेच्या बाजारावर अवलंबून असलेल्या आयटी कंपन्यांचे समभाग काल १.८ टक्क्यांनी घसरले.
यासोबतच, खासगी बँकांचेही समभाग घसरले. काल एचसीएल टेक, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स, इन्फोसिस, टायटन, आयसीआयसीआय बँक, सन फार्मा, रिलायन्स इंडस्ट्रीज, लार्सन अँड टुब्रो, टेक महिंद्रा आणि एनटीपीसी सर्वात जास्त पिछाडीवर होते. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर ०.१२ टक्क्यांनी वाढून ७४.८६ डॉलर प्रति पिंपवर पोहोचले. शुक्रवारी निर्देशांक १९१.५१ अंकांनी घसरुन ७७,४१४.९२ वर स्थिरावला होता. तर, निफ्टी ७२.६० अंकांनी घसरून २३,५१९.३ वर बंद झाला होता.
Related
Articles
गुजरातमध्ये फटाक्याच्या गोदामात स्फोट
02 Apr 2025
कठुआतील जंगलात दहशतवाद्यांचा शोध सुरुच
01 Apr 2025
शनी मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी
30 Mar 2025
अंदमान-निकोबारच्या नॉर्थ सेंटिनेल भागात घुसखोरी; एका अमेरिकन नागरिकाला अटक
04 Apr 2025
मूळ पुणेकरांचा कानोसा आणि पुणे वाचवा चळवळ !
03 Apr 2025
समाजकंटकांपासून दूर राहा
03 Apr 2025
गुजरातमध्ये फटाक्याच्या गोदामात स्फोट
02 Apr 2025
कठुआतील जंगलात दहशतवाद्यांचा शोध सुरुच
01 Apr 2025
शनी मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी
30 Mar 2025
अंदमान-निकोबारच्या नॉर्थ सेंटिनेल भागात घुसखोरी; एका अमेरिकन नागरिकाला अटक
04 Apr 2025
मूळ पुणेकरांचा कानोसा आणि पुणे वाचवा चळवळ !
03 Apr 2025
समाजकंटकांपासून दूर राहा
03 Apr 2025
गुजरातमध्ये फटाक्याच्या गोदामात स्फोट
02 Apr 2025
कठुआतील जंगलात दहशतवाद्यांचा शोध सुरुच
01 Apr 2025
शनी मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी
30 Mar 2025
अंदमान-निकोबारच्या नॉर्थ सेंटिनेल भागात घुसखोरी; एका अमेरिकन नागरिकाला अटक
04 Apr 2025
मूळ पुणेकरांचा कानोसा आणि पुणे वाचवा चळवळ !
03 Apr 2025
समाजकंटकांपासून दूर राहा
03 Apr 2025
गुजरातमध्ये फटाक्याच्या गोदामात स्फोट
02 Apr 2025
कठुआतील जंगलात दहशतवाद्यांचा शोध सुरुच
01 Apr 2025
शनी मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी
30 Mar 2025
अंदमान-निकोबारच्या नॉर्थ सेंटिनेल भागात घुसखोरी; एका अमेरिकन नागरिकाला अटक
04 Apr 2025
मूळ पुणेकरांचा कानोसा आणि पुणे वाचवा चळवळ !
03 Apr 2025
समाजकंटकांपासून दूर राहा
03 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
अर्थव्यवस्था हेलपाटण्याच्या मार्गावर
2
आरक्षणाचे राजकारण
3
उत्पादन क्षेत्राला ‘आधार’
4
म्यानमार, थायलंडला भूकंपाचा धक्का
5
लाडके ‘खास’(अग्रलेख)
6
वाचक लिहितात